Monday, 27 February 2012

Posted by Picasa

मन उधाण वार्‍याचे...!



सांजावलेल्या ढगांवर उमटलेला,
निलगिरीचा शेंडा...

ती झुलणारी काळसर पानं
पाहताना,
माझ्यातले दोष
जणू गळून पडले.....सारे!
क्षणांत हलकं झालं
मन..... चित्त!

आज जडत्वाला सारून
शरिराचाही, तरंगण्याचा आग्रह....!
मनाचा चंचलपणा
कसला आलाय साधायला?
मन तर कधीच परागंदा....वार्‍यासवे!
सांजेच्या रंगात
मनसोक्त उनाडत राहिलं,
माखत राहिलं...

उरला आनंद...!
दु:ख, अश्रू तर कधी नव्हतेच जणू..
आता, फक्त आनंद.. निखळसा!
साठलेला,
हक्काने झिरपू पाहणारा!

पण;
अलवार भान आलंच,
स्थळा- काळाचं!

रंग तिथेच सोडून
पायउतार झालेल्या,
निरभ्र मनाचा हात- हातात घेऊन
मीही... परतीच्या वाटेवर....

कित्तीतरी दिवसांनी- आज,
माझ्यातल्या "मला" सोबत घेउन..!
.....वर्णावी कितीक महती
.....माझ्या मराठी मायेची .......

मान ताठ आहे मराठीची
गर्व आहे मज मी मराठी
भाग्य समजतो मी मराठी ......

सह्याद्रीचे कडे उभे सोबती
रांगडे मावळे त्वेषाने लढती
खिन्डीतही गनिमास मारिती.......

दिह्लीचेही ते तख्त फोडूनी
पाणीपताही धडक मारुनी
मराठीचे नाव पार उंचावती .......

शत्रू जरी ते अनेक असती
एकटेही वीर पुरून उरती
नका अडवू वाट ती अमुची .......

गनिमास जागी खतम करती
उलट बोलण्या जीभा नसती
वाकेल पण मोडणार नाही ......

ही प्रवृत्ती आहेच सदाची
ताठ मानेची मर्दुमकेची
जगी मराठी नाव गर्जविती......

धर्मासाठी स्वतः वार खाती
प्राणाचीही तमा न बाळगती
म्हणूनी "शंभू"अमर राहती......

पहाडी बाणा कुणा न झुकती
मराठी हे नाव सार्थ ठरविती
माय मावूलीस प्रणाम करती

......वर्णावी. कितीक महती
..........माझ्या मराठी मायेची .......

मैत्री...:)

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैञी.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री......:)

sanket choudhary: आयुष्य

sanket choudhary: आयुष्य: आहे काय आणखीन या आयुष्यात, Career struggle. या व्यतिरिक्त. रोज धडपड करा, दोन पैसे कमावण्यासाठी पैसा मिळवा आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठ...

आयुष्य



आहे काय आणखीन या आयुष्यात,
Career struggle. या व्यतिरिक्त.
रोज धडपड करा, दोन पैसे कमावण्यासाठी
पैसा मिळवा आपलं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी

स्वप्नं पाहतानाहि मनाची चलबिचल होते
"ती स्वप्न पूर्ण करता येतील का?"
अशी एक हुरहूर नेहमी असते

स्वप्ने रंगवताना हि परिस्थितीचे भान असावे लागतं
मोठ - मोठी स्वप्नं पाहण्यासाठी, हातांमध्ये आभाळ असावं लागतं

कितीही खस्ता खाल्ल्या तरी
आयुष्याची तडजोड कधीही सुटत नाही
"आयुष्य जगायचंय आयुष्य जगायचंय " म्हणताना
एक -एक क्षण हि पुरेसा उरत नाही.

एका- एका क्षणाचा हिशोब हि उरत नाही घाम गाळताना
नशिबात जे लिहिले आहे तेच मिळते आयुष्य जगताना. ♥♥♥